भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये गुळाला अनन्य साधारण महत्व आहे . भारतामध्ये पुर्वीपासूनच गुळ अगदी प्रामुख्याने वापरला जातो . महाराष्ट्रामध्ये गुळाचा उपयोग हा पुरणपोळी, मोदक, नारळीभात यासारख्या पदार्थामध्ये केला जातो. त्याचबरोबर भाजी ,आमटी अगदी चहा मध्ये सुद्धा गुळाचा वापर सर्रास होतो. गुळामुळे पदार्थाची चव तर वाढतेच पण असे पदार्थ खाणं हे आरोग्याला पोषक असत. भारतामध्ये गुळ प्रामुख्याने उसापासून तयार केला जातो , पण काही देशामध्ये गुळ हा पाम आणि खजुरापासुनही बनवतात. भारतामध्ये गुळ वापरण्याची परंपरा हजारो वर्षांपासून आहे.